मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांची, निवड…

⚡मालवण ता.२३-: मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांची, तर सचिवपदी कृष्णा ढोलम यांची निवड करण्यात आली आहे.

मालवण तालुका पत्रकार समितिच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी मालवण शासकीय विश्रामगृह येथे विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर व किशोर जैतापकर यांच्या उपस्थितीखाली झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली.

यामध्ये उपाध्यक्षपदी आचरा येथील पत्रकार परेश सावंत व कट्टा येथील पत्रकार विशाल वाईरकर यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी संदीप बोडवे, सहसचिवपदी नितीन गावडे यांची निवड करण्यात आली. तर समिती सदस्य म्हणून राजेश पारधी, भूषण मेतर, विकास गावकर, आप्पा मालंडकर, संतोष हिवाळेकर, संग्राम कासले आणि उदय बापर्डेकर यांचीही निवड करण्यात आली. कार्यकारिणीत पालक सदस्यपदी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत आणि जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर यांचाही सहभाग पदसिद्ध सदस्य म्हणून राहणार आहे.

या निवड बैठकीला मावळते तालुकाध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौगंधराज बादेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर यांच्यासह प्रफुल्ल देसाई, राजेंद्र खांडाळेकर, नंदकिशोर महाजन, विवेक नेवाळकर, डी. टी. मेथर, महेश सरनाईक, मनोज चव्हाण, समीर म्हाडगूत, गणेश गावकर, अनिल तोंडवळकर, प्रशांत हिंदळेकर, नितीन आचरेकर, भाऊ भोगले, झुंजार पेडणेकर, शैलेश मसुरकर, संतोष अपराज, अमोल गोसावी, सुरेश घाडीगावकर, सुधीर पडेलकर, महेश कदम, ओमकार यादव आदी उपस्थित होते.

सर्व सदस्यांच्या विश्वासास पात्र ठरणार – पेडणेकर

मालवण तालुक्यातील ४४ सदस्यांनी आज माझ्यावर विश्वास दाखविला आहे. या सदस्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे काम आपण करणार आहे. मला मिळालेल्या दोन वर्षांच्या मुदतीत पत्रकारांच्या समस्या आणि त्यांच्या सन्मानासाठी आपण कार्यरत राहणार आहे . मी माझ्या क्षमतेने सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम पत्रकार संघाच्या सभासदांसाठी राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे नूतन अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page