⚡देवगड ता.०५-: तरुण विकास मंडळ, वाडातर (रजि.) मुंबई यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून ११ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन श्री हनुमान मंदिर, वाडातर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने १३ एप्रिल रोजी मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची ही उपस्थिती असणार आहे.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ ,सकाळी १० वा. होमहवन, लघु रुद्राभिषेक,दुपारी १२ वा. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वाडातर यांचे सुस्वर भजन (बुवा श्री. रामचंद्र चोपडेकर),सायंकाळी ७ वा. फुगडी जुगलबंदी: सखी फुगडी संघ, पावशी (कुडाळ) विरुद्ध महादेश्वर फुगडी ग्रुप, नाडण पुजारेवाडी (देवगड),रात्रौ १० वा. तालुकास्तरीय पारंपरिक भजन स्पर्धा.
शनिवार, १२ एप्रिल २०२५ (हनुमान जयंती)पहाटे ५ वा. प्रवचन: ह. भ. प. श्री. शिरीष कोरगांवकर (मुंबई),सकाळी ६.२४ वा. श्री हनुमान जन्मोत्सव महापूजा व आरती,सकाळी ८ वा. सामूहिक नामजप,दुपारी १२ वा. महाप्रसाद भंडारा,सायंकाळी ४ वा. – श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक,रात्री ९ वा. गाऱ्हाणी,रात्री १० वा. स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम.
रविवार, १३ एप्रिल २०२५ सकाळी ९ वा. – भव्य रक्तदान शिबिर, सायंकाळी ४ वा. – महिलांचा हळदीकुंकू समारंभ व पैठणीचा खेळ,सायंकाळी ६ वा. – भव्य सत्कार समारंभ:मा. नाम. श्री. नितेश राणे (मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, सिंधुदुर्ग)तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेते व शौर्यगौरव प्राप्त व्यक्तींचा सत्कार सोहळा,रात्री १० वा. – पौराणिक दशावतारी नाटक: ‘दास रामाचा हनुमंत नाचे’सादरकर्ते: खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोली वेंगुर्ला (सौजन्य: रामचंद्र (बबन) सारंग, तिर्लोट – भाटवाडी)
सोमवार, १४ एप्रिल २०२५,सायंकाळी ४ वा. – श्री सत्यनारायण महापूजा, आरती व दर्शन,रात्री ८ वा. – वाडातर ग्रामस्थ भजन मंडळ यांचे सुस्वर भजन (बुवा श्री. भगवान जुवाटकर),रात्री १० वा. – महिलांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना:बुवा सौ. साची मुळम, बुवा ऋतुजा सावंत-पाळेकर विरुद्ध श्री गजानन प्रसादिक महिला भजन मंडळ, पुरळ – हुर्शी मालवीर भूतनाथ प्रासादिक महिला भजन मंडळ, घोणसरी – कणकवली आजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
