⚡देवगड ता.०५-:
श्रीराम नवमीच्या पावनदिनी, ६ एप्रिल २०२५ रोजी, कुलसुम अॅग्रो टेक, नारींग्रे व युवा रक्तदाता ग्रुप दहिबाव, बागमळा, नारींग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, देवगड यांच्या सौजन्याने नारिंग्रे येथील राम मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिर, मिशन परिचय आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून या शिबिरादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून.ललित नेवे (रक्तसम्राट) – टाटा पॉवर, मुंबई उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९:३० ते १०:३० परिचय व गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते एक या वेळात रक्तदान शिबि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे .
मिशन सिंधू रक्तक्रांती २०२५–२०३० अंतर्गत उपक्रम हाती घेतला असून या शिबिरात मिशन सिंधू रक्तक्रांती अंतर्गत रक्तदान जनजागृती केली जाणार असून, नियमित रक्तदात्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. यासोबतच रक्तदाते व रक्तदूत यांचा गौरव, तसेच विशेष बॅज आणि भेटवस्तू देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी परेश रुमडे , दिनेश खोत, प्रसाद परब यांनी केले आहे. "रक्तदानाचा हेतू, बांधूया जीवनसेतू!" या उद्देशाने आयोजित या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
