नरडवेसह आजूबाजूच्या गावांत पाऊस…

रस्त्यावर झाडे कोसळली ; वीज पुरवठा देखील खंडित..

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी झाडांची पडझड देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आंबा, काजूची झाडे देखील काही ठिकाणी घरांवर पडली आहेत. काही ठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवर देखील झाडे कोसळली होती. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील कोलमडली. स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ठप्प झालेले रस्ते वाहतुकीस सुरळीत केले. दरम्यान यावेळी विज पुरवठा देखील खंडित झाला होता. मंगळवारी आणि बुधवारी कणकवली तालुक्यातील हळवल, शिवडाव, कनेडी, नरडवे, नाटळ, फोंडा, वैभववाडी या भागात पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाने आंबा आणी काजू बागायतदार मात्र चिंतेत सापडले आहेत.

You cannot copy content of this page