⚡मालवण ता.०२-:
भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस( राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी पलक प्रदीप चव्हाण हिने जिल्हास्तरावर सर्वसाधारण यादीत २० वा क्रमांक तर कुमार मयूर पद्माकर चव्हाण यांनी 27 वा क्रमांक प्राप्त केला.
या दोन गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.
या दोघांचे स्थानिक समिति अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे,मुख्याध्यापिका रसिका गोसावी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.
