चौके हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा…

3 मे रोजी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी होणार साजरा:1962 ते 2023 या 61 वर्षातील कालखंडातील माजी विद्यार्थी पुन्हा येणार एकत्र..

⚡मालवण ता.०२-:
चौके येथील भ.ता चव्हाण, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या प्रशालेतील स.न 1962 ते 2023 या 61 वर्षाच्या कालखंडातील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा चौके हायस्कूलच्या भव्य भटांगणावर शनिवार दिनांक 3 मे 2019 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.हा मेळावा म्हणजे न भूतो न भविष्यती असा आपल्या विद्या मातेचे मंदिरात भरणारा कुंभमेळाच ठरणार आहे. 61 वर्ष म्हणजे कपिलाषष्ठीचा योग.. आपल्या तमाम हजारो माजी विद्यार्थी बंधू भगिनींना भेटण्याची एकमेव दुर्मिळ सुवर्णसंधी सर्वांनाच लाभणार आहे.या महामेळाव्यात या 61 वर्षातील कालखंडातील शिक्षकाना सन्मानित करण्यात येणार आहे.सदर मेळावा 2 सत्रात होणार असून दिवसभर माजी विद्यार्थ्यांचे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी चौके गावासह पंचक्रोशीतील आंबेरी, देवली, साळेल, आमडोस, नांदरुख, कर्लाचाव्हाळ या पंचक्रोशीतील शेकडो माझी विद्यार्थी या महामेळाव्यास सहभागी होण्यासाठी इच्छुक झाले आहेत.यासाठी आता प्रत्येक गावागावात नियोजन चालू झाले आहे.गावागावातून स्थानिक माजी विद्यार्थी आपल्या सहकारी माजी विद्यार्थी या मेळाव्याला येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.प्रत्येकजण आपापली बॅच मधील मुलांचा शोध घेत आहेत व व्हाट्सअप च्या माध्यमातून जोडत आहेत. मेळावा यशस्वी होण्यासाठी गावागावात वाडीवाडीत मीटिंग घेतल्या जात आहेत. एकूणच या अभूतपूर्व, ना भूतो भविष्यती मेळाव्याला साक्षीदार होण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांकडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तरी ओके हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या 1962 ते 2023 या कालखंडातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन चौके हायस्कूल माजी विद्यार्थी महामेळावा मंच यांच्याकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page