Headlines

अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आंबोली येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ची पाहणी…

आंबोली,ता.२७: वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ची पाहणी अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज केली. तसेच सर्वे क्रमांक २१६ प्लॉट मध्ये नांगरतास मध्ये ही स्थळ पाहणी उस संशोधन संदर्भात केली.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,आमदार दीपक केसरकर , उपस्थित होते.त्यांची बैठक उस संशोधन केंद्रात झाली. यावेळी पत्रकारांशी फक्त आपण याठिकाणी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर याठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याकरता आलो असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब,प्रेमानंद देसाई, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका कुडाळकर,अबीद नाईक,तसेच राष्ट्रवादी चे पदाधिकारी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांत हेमंत निकम,तहसीलदार श्रीधर पाटील,पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निरीक्षक अमोल चव्हाण, गट विकास अधिकारी वासुदेव नाईक,कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण,बांधकाम विभाग अधिकारी विजय चव्हाण,शैलेश राणे, तलाठी सुमित घाडीगावकर,मंडळ अधिकारी संजय यादव, तसेच सर्व खात्याचे अधिकारी तसेंच आंबोली सरपंच सावित्री पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, दिलीप सावंत,सुनील नार्वेकर,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान आंबोली मध्ये हेलिकॉफ्टर उतरताना भरपूर धुरळा उडाला. इतका जबरदस्त की सगळे धुळीचा लोट बघून पळाले.कोणीही तिथे थांबले नाही. सर्व पत्रकार, प्रशासन देखील तेथून पळाले.धुरळा बसल्यानंतर थोड्या वेळाने त्याठिकाणी हेलिकॉफ्टर जवळ गेले.मंत्री अजित पवार ही बसून राहिले .मात्र उतरल्यानंतर त्यांनी “पाणी मारा रे ,पाणी मारा” असे ५ वेळा सांगितले प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील याठिकाणी पाणी मारा असे सांगितले. प्रशासनाचा गोंधळ उडाला. यानंतर केसरकर व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

You cannot copy content of this page