राहूल गांधी हा चेहरा भविष्यात काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल…

हर्षवर्धन सपकाळ:मंत्री नितेश राणे यांना समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात ठेवले..

⚡सावंतवाडी ता.१५-: फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर चालला आहे, त्यामुळे देशाची संस्कृती,परंपरा व विचारांचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या काळात काॅग्रेस आक्रमकतेने लढणार आहे. राहूल गांधी हा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा जास्त पटलावर असून भविष्यात हाच चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल असा विश्वास काॅग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे व्यक्त केला.

तर भाजपाने मंत्री नितेश राणे यांना समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात ठेवले आहे शिवाय या कामासाठी त्यांना वेगळा पगारही दिला जात आहे अशी टीकाही श्री सपकाळ यांनी केली.

You cannot copy content of this page