पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन..

⚡मालवण ता.१५-:
भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवण व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थिनींसाठी आयोजित पाककला स्पर्धा भंडारी हॉल मालवण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत स्पर्धकांनी मासे व चिकन यापासून विविध रुचकर व मसालेदार पदार्थ सादर केले होते.

स्पर्धेचे उदघाटन मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी मालवणचे नायब तहसीलदार नागेश शिंदे, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सचिव दशरथ कवटकर, लोकल कमिटी खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्राध्यापक पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. दळवी, माजी विद्यार्थिनी व मत्स्य विभाग अधिकारी तेजस्विता करंगुटकर, माजी विद्यार्थी सौगंधराज बादेकर, हेमंत शिरगांवकर, भूषण मेतर, ललित चव्हाण, अनिकेत फाटक, शुभम मेस्त्री,आकाश गोसावी, लतेश मडये सुजल कांबळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बांदेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्पर्धकांनी मासे व चिकन पासून बनविलेले विविध चवदार पदार्थ बनवून आणून आकर्षक पद्धतीने सजावट करून मांडले होते. स्पर्धेचे परीक्षण अतिथी बांबू हॉटेलचे मालक संजय गावडे, आशीर्वाद कॅटरर्सच्या मालक सौ. ममता वराडकर, काळबादेवी एक्झॉटीकाचे शेफ वैभव तोंडवळकर यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा प्रमुख रुचिरा नार्वेकर, अश्विनी वायंगणकर रुपल परब, कॉलेजचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले. आभार सौ. प्रणाली शिंदे यांनी मानले.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल ४ मे रोजी मालवण येथे होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page