⚡मालवण ता.१५-:
मालवण देऊळवाडा येथील श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे रविवार दि. १६ मार्च रोजी तुकाराम बीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी पादुका पूजन, अभिषेक, दुपारी श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर स्थानिक कलाकारांचे ढोलकी भजन तसेच आनंदव्हाळ येथील बुवा बाळा सामंत यांचे संगीत भजन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवण देऊळवाडा येथे उद्या तुकाराम बीज कार्यक्रम…
