कट्टा येथे २ मार्च रोजी खो-खो जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी…

⚡मालवण ता.२७-:
दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशन, सिंधुदुर्गच्यावतीने सन २०२४-२५ या वर्षातील पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा वराडकर हायस्कूल, क‌ट्टा येथे रविवार दि. २ मार्च रोजी होणार आहे, या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ दि. १३ ते १६ मार्च या कालावधीत अहिल्यानगर (अहमदनगर) येथे होणाऱ्या ६० व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था इत्यादी सर्वाना प्रवेश मिळेल. खेळाडूंनी २ मार्च रोजी ९ वाजता हजर राहावे. प्रवेशिकेसाठी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजे पर्यंत आहे. प्रवेश अर्ज ९७६७५९२१६० किंवा ७०६६९१४८५३ या मोबाईल क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशन, सिंधुदुर्ग चे सचिव संजय पेंडूरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page