कोळंब न्हिवे येथील ब्राह्मणदेव मंदिराच्या सभामंडपाचे उदघाटन…

⚡मालवण ता.२७-:
मालवण तालुक्यातील कोळंब न्हिवे येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराचा सभामंडप माजी आमदार वैभव नाईक याच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. या सभामंडपाचे उदघाटन ब्राह्मणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना प्रवक्ते मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, निखिल नेमळेकर, स्वप्नील परब, रोशन नेमळेकर, राकेश लाड, राजन दळवी, प्रथमेश लाड, श्रीपाद नेमळेकर, गुणेश गांगण, स्वप्नील दळवी, सुरेश लाड, अभय लाड, प्रतीक पाताडे, सिद्धेश पाताडे, भावेश पाताडे, गणेश परब, प्रथमेश परब, रवींद्र लाड, अंकुश कातवणकर, अभिमन्यू परब, संगम प्रभुगावकर, कोळंब न्हिवे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page