मालवणात मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.२७-: लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर दैवज्ञ भवन मालवण येथे संपन्न झाले.
या शिबिराचा ८० रुग्णांनी लाभ घेतला. २५ गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन उद्योजक सागर वाडकर यांनी केले. तसेच यां औषधाचे त्यांना आलेले अनुभव कथन केले. तसेंच डॉ. इनामदार यांनी औषधविषयी गुणकारी माहिती दिली. लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन आणि आभार गणेश प्रभुलकर यांनी केली.

यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, झेंडसी विश्वास गावकर, सेक्रेटरी फेनी फनार्डीस, खजिनदार पल्लवी खानोलकर, जयश्री हडकर, रुजरीओ पिंटो, उमेश शिरोडकर, मेघश्याम शंकरदास, गणेश प्रभुलकर, सहदेव बापार्डेकर, मुकेश बावकर, मोहन पटेल, मुकेश बावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, वैशाली शंकरदास, मातृत्व आधार फौंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर उपस्थित होते

या शिबिरात पुणे येथील डॉ. ए. एच. इनामदार यांनी रुग्णांना रक्तातील साखर आणि त्यामुळे होणाऱ्या आजरावर मार्गदर्शन केले. सोबत आयुर्वेदिक औषधे रुग्णांना मोफत वितरित केली. शरीरातील छोटी मोठी दुखणी योगाने कशी बरी होतील याबाबत योगसनाचे प्रकार दाखवले. तसेच रोजचा आहार कसा असावा,
काय बदल करावे. याचेही मार्गदर्शन डॉ. इनामदार यांनी केले. त्याच्या सोबत त्याची पूर्ण टीम उपस्थित होती.

You cannot copy content of this page