वैभववाडी प्रतिनिधी
दीड वर्षाच्या कालावधीनंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशी, व्यापाऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मात्र एस टी महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एस. टी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही.
गेल्यावर्षी २२ जानेवारी पासून करून घाटातील नूतनीकरणाचे कामाला सुरुवात करण्यात आल्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आली होती. सुरवातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर घाटातील कामाचा आढावा घेत प्रशासनाकडून वाहतूक सुरु करण्याच्या तारीख पे तारीख देण्यात आल्या. मात्र प्रशासन त्या त्या तारिखला घाट मार्ग सुरु करू शकले नाही. त्यामुळे सर्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत उबाठा सेनेकडून घाट सुरु करण्यासाठी घाटाची पाहणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता.
पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथम करूळ घाटाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी घाटाची पाहणी केली होती. तसेच सुरक्षतेची सर्व खबरदारी घेऊनच त्यानंतर वाहतूक सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली. तर स्वतः जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनीही काही दिवसापूर्वी करूळ घाटात भेट देऊन पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
सध्या काही दिवस वैभववाडी करूळ घाटातून कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
करुळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू…!
