Headlines

करुळ येथील श्री देव रामेश्वर, केदारलिंग मंदीरात महाशिवरात्री उत्सव…

वैभववाडी प्रतिनिधी :
करूळ येथील श्री देव रामेश्वर मंदिर व श्री देव केदारलिंग मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी पूजा, आरती तसेच सायंकाळी महाप्रसाद, रात्री ८ वा. कीर्तनकार ह. भ.प. संगीताताई काठोळे नवी मुंबई यांचे कीर्तन , दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी अभिषेक, पूजा, महाआरती, रात्री पालखी मिरवणूक सोहळा, तसेच रात्री ८ वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. २७ रोजी सकाळी पूजा, आरती, तसेच रक्तदान शिबीर, दुपारी महाप्रसाद. तरी या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान मंडळी, वारकरी मंडळी व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page