त्या मुस्लिम परप्रांतीयांकडून घडलेल्या देशविरोधी कृत्याचा मालवणातील स्थानिक मुस्लिम समाज संघटनेकडून निषेध…!

⚡मालवण ता.२४-: रविवारी रात्री भारत – पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर मुस्लिम परप्रांतीयकडून भारत विरोधी घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मालवणातील स्थानिक मुस्लिम समाजाकडून त्या मुस्लिम परप्रांतीयांकडून घडलेल्या देशविरोधी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे

याबाबतचे निवेदन सुन्नत जामतूल मुस्लिमीन मालवण या संस्थे मार्फत मालवण पोलीस ठाण्यात देण्यात आल्याची माहिती मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली . पोलिसांना निवेदन देतेवेळी हसरत खान, जब्बीर खान, सलीम खान, बखतीयार खान, बशीर अथणिकर, मुस्ताक थणिकर कैसर पठाण आदी व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page