नव नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत: सरपंच सौ.माधुरी चव्हाण…

⚡मालवण ता.२४-:
मी लाभार्थी सारथी या संगणकीय डिप्लोमा कोर्स दशक्रोशितील विद्यार्थ्यांच्या साठी सुवर्ण संधी असून याचा लाभ घेऊन नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे प्रतिपादन नांदोस गावच्या सरपंच सौ.माधुरी चव्हाण यांनी येथे बोलताना केले

छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे सारथीच्यावतीने युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत संगणकीय प्रशिक्षण दिले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी MKCL चे कट्टा येथील अधिकृत केंद्र स्मिता कम्प्युटर एज्युकेशनच्यावतीने मी लाभार्थी सारथी या संगणकीय डिप्लोमा कोर्स दशक्रोशीतील विद्यार्थ्यां साठी सुरू करण्यात आला आहे त्याचे प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला यावेळी उपसरपंच श्री. विजय निकम ग्रामपंचायत ग्राम विस्तार अधिकारी श्री.प्रकाश सरमळकर स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका श्रद्धा सुनील नाईक आदी व इतर उपस्थित होते

यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका श्रद्धा सुनील नाईक यांनी स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था द्वारे चालवले जाणारे विद्यार्थी कौशल्य उपक्रम तसेच सारथी डिप्लोमा कोर्स या विषय माहिती दिली यावेळी सदर डिप्लोमा पूर्ण झालेल्या वेदांत माधव, सानिका गावडे, प्राची गावडे यांची चार मॉडेल ची सर्टिफिकेट आणि डिप्लोमा चे अशी प्रमाणपत्र व दोन हजार अनामत रक्कम ग्राम सभेत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी महिला बचतगटा च्या पदाधिकारी, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शिक्षक- शिक्षिका, कृषी विस्तार अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, नांदोस परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page