⚡मालवण ता.२२-: माघी गणेशोत्सव मंडळ, फोवकांडा पिंपळ, मालवण आयोजित गीत गायन व कथाकथन स्पर्धेत मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यामध्ये कथाकथन स्पर्धा- गट क्रमांक २ – इयत्ता पहिली -दुसरी- श्रीनिधी युवराज तारी (इयत्ता पहिली)- उत्तेजनार्थ क्रमांक, गट क्रमांक ३ – इयत्ता ३री -४ थी – रेणुका गुरुनाथ चव्हाण इयत्ता चौथी- प्रथम क्रमांक, यशश्री शशिकांत मोरजकर इयत्ता चौथी – उत्तेजनार्थ, गीत गायन स्पर्धा गट क्रमांक ३ – इयत्ता तिसरी चौथी- रिया प्रसाद केळुसकर – इयत्ता चौथी -द्वितीय क्रमांक. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर, स्कूल कमिटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत मुख्याध्यापक भूपेश गोसावी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .
