एमकेसीएलतर्फे २६ पासून ‘ज्ञानदीप’ कृतज्ञता सप्ताह…

रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य:विद्यार्थ्यांना मोफत शिकता येणार विविध डिजिटल स्किल्स..

⚡कुडाळ ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासना अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त आजपर्यंत एमकेसीएलशी जोडल्या गेलेल्या सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप हा कार्यक्रम एमकेसीएलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये कृतज्ञता सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने एमकेसीएलचे विविध उपक्रमातील सात निवडक उपक्रम विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी विनामूल्य या सप्ताहात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये सर्वानी सामील व्हाव आणि आजच्या युगातील नवनवीन डिजिटल स्किल्स अवगत करून घ्यावीत अस आवाहन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी केल आहे.
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग च्या जमान्यामध्ये नवनवीन बदल होत असताना आणि अल्फा जनरेशन सोबत प्रवास करत असताना काही बदल आपल्याला करणे आवश्यक झालेले आहेत आणि हे नवनवीन बदल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. एमकेसीएल चे बोधवाक्य “ज्ञानदीप लावू जगी” असे आहे आणि गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना कम्प्युटर साक्षर करणाऱ्या आमच्या या MS-CIT च्या अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये आता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम सुरू झालेले आहेत त्यातील काही उपक्रम खालील उपक्रम आमच्या सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकरिता कृतज्ञता म्हणून विनामूल्य दिले जाणार आहेत.
सायबर सिक्युरिटी अवेअरनेस सेमिनार
डिजिटल क्युरीयॉसिटी सेमिनार
एमकेसीएल करिअर ॲप
करिअर इनक्लीनेशन टेस्ट म्हणजेच कलचाचणी
१० वी च्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षे संदर्भात मार्गदर्शन
१२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षे संदर्भात मार्गदर्शन
फर्स्ट लेसन इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग

सायबर सिक्युरिटी अवेअरनेस सेमिनार
आजच्या डिजिटल युगात, सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. आपण सर्व जण ऑनलाइन बँकिंग, शॉपिंग आणि सोशल मीडियाचा वापर करतो, ज्यामुळे आपली वैयक्तिक माहिती आणि आर्थिक डेटा धोक्यात येऊ शकतो. सायबर गुन्हेगार आपल्या माहितीचा गैरवापर करून आपले पैसे चोरणे, आपली ओळख चोरणे किंवा आपले डिव्हाइस नष्ट करू शकतात.
म्हणूनच, सायबर सुरक्षेबद्दल जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना यासंदर्भात योग्य माहिती आणि प्रेझेन्टेशन MSCIT च्या केंद्रांवर या सप्ताहात मिळेल.

डिजिटल क्युरीयॉसिटी सेमिनार ( AI ML चा वापर)
आजच्या काळात, नवीन मोबाइल ॲप्स चा वापर झपाट्याने वाढत आहे. या ॲप्सआपले जीवन सोपे आणि अधिक सोयीस्कर बनवू शकतात, परंतु त्यांचा वापर करताना सुरक्षितता आणि खाजगीपणाच्या समस्यांबद्दल जागरूक असणे देखील महत्त्वाचे आहे.
डिजिटल कुतूहल परिसंवाद नवीन मोबाइल ॲप्सबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्यांचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन MSCIT च्या केंद्रांवर या सप्ताहात मिळेल.

एमकेसीएल करिअर ॲप
गुगल प्ले स्टोअर वर हे ॲप आपल्याला मोफत मिळणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस टेस्ट, करिअर चार्ट तज्ञ शिक्षकांचे व्हिडिओ, करिअर मार्गदर्शन संदर्भात व्हिडिओ आणि एमकेसीएलच्या विविध कोर्सचे डेमो बघायला मिळतील जेणेकरून विद्यार्थी स्वतःच स्वतःला काय शिकायला आवडेल हे ठरवू शकेल. आणि हे ॲप या सप्ताहात प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला MSCIT च्या केंद्रांवर विनामुल्य दिले जाईल.

करिअर इनक्लीनेशन टेस्ट अर्थात कलचाचणी
आजच्या स्पर्धात्मक युगात, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कौशल्यांना आणि आवडीनिवडींना अनुकूल असा करिअर मार्ग निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. MKCL चा कॅरिअर इन्क्लिनेशन टेस्ट आणि फ्युचर वेध टेस्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता, रुची आणि मूल्यांमध्ये अंतर्दृष्टी मिळवण्यात मदत करणारी आहे.
या सप्ताहात प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला MSCIT च्या केंद्रांवर हि काळ चाचणी विनामुल्य देता येईल.

१० वी च्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षे संदर्भात मार्गदर्शन
प्रत्येक विषयांसाठी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट, प्रत्येक विषयांसाठी बहुपर्यायी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट, मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांसाठी उपलब्ध असेल.त्याचप्रमाणे मॉडेल प्रश्नसंच व उत्तरपत्रिका, परीक्षा अध्ययन मार्गदर्शिका, पेपर लेखन तंत्र, १० वी नंतरचे करिअर मार्गदर्शन इत्यादी सुविधा या सप्ताहात प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला MSCIT च्या केंद्रांवर विनामुल्य देता मिळतील.
New Offering : दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका कशा लिहाव्यात याकरिता दहा तासांचा एक कोर्स MSCIT केंद्रांवर विनामूल्य उपलब्ध केलेला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिका कशाप्रकारे लिहिल्या आहेत हे तपासले जाईल. एमकेसीएल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे टूल यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध केलेले आहे.

१२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षे संदर्भात मार्गदर्शन
प्रत्येक विषयांसाठी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट, प्रत्येक विषयांसाठी बहुपर्यायी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट, मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांसाठी उपलब्ध असेल.त्याचप्रमाणे मॉडेल प्रश्नसंच व उत्तरपत्रिका, परीक्षा अध्ययन मार्गदर्शिका, पेपर लेखन तंत्र, १२ वी नंतरचे करिअर मार्गदर्शन इत्यादी सुविधा या सप्ताहात प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला MSCIT च्या केंद्रांवर विनामुल्य देता मिळतील.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मधील प्राथमिक माहिती ” (FLAI
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात एक तल्लीन करणारा आणि व्यापक अनुभव प्रदान करण्यासाठी एमकेसीएल ने डिझाइन केलेला (FLAI) अभ्यासक्रम या सप्ताहामध्ये सर्व विद्यार्थ्यांना MSCIT च्या केंद्रांवर विनामुल्य तिला जाणार आहे.
एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या ज्ञानदीप या कृतज्ञता सप्ताहात आपण सर्वांनी सामील व्हावे आणि आजच्या युगातील नवनवीन डिजिटल स्किल्स अवगत करून घ्यावीत असे आवाहन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी केले आहे

You cannot copy content of this page