कुडाळमध्ये जन्मजात व्यंग असलेल्या बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर…

मुंबईच्या तज्ञ डॉक्टर्सची टीम करणार शस्त्रक्रिया:आयोजकांकडून गेली सहा वर्ष सुरु आहे उपक्रम

⚡कुडाळ ता.२२-: रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ तसेच सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियाचं मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. कुडाळमध्ये माता बाल रुग्णालय इथं हे शिबीर होणार आहे. जिल्ह्यामध्ये जन्मजात व्यंग असलेली बालके यांच्या आजारावरती उपचार म्हणून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये मोफत स्वरूपात करण्यात येणार असून या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर्स भूलतज्ज्ञ यांची टीम मुंबईहून येणार आहे. यंदाचं हे या उपक्रमाचं सहावं वर्ष आहे. अशी माहिती आज रोटरीचे क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे आणि प्रणय तेली यांनी दिली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राजीव पवार, खजिनदार मकरंद नाईक ,राजन बोभाटे, प्रणय तेली, शशिकांत चव्हाण , सचिन मदने, रूपेश तेली, राकेश म्हाडदळकर, उमेश गाळवणकर आदी उपस्थित होते.
या शिबिरासाठी उमेश गाळवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तसेच या शिबिरासाठी डॉक्टरअमेय देसाई यांचे विशेष सहकार्य व कोऑर्डिनेशन लाभले आहे. डॉक्टर संजय ओक लहान मुलांच्या शस्त्रक्रियेचे विशेष तज्ञ तसेच के एम हॉस्पिटलचे डिन आणि कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र स्टेटचे सदस्य या शिबिरासाठी सेवा देण्यासाठी कुडाळ येथे येत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या टीम मधील इतर स्पेशालिस्ट सर्जन स्पेशलिस्ट भूलतज्ज्ञ तसेच असिस्टंट कुडाळ येथे येऊन माता बाल आरोग्य केंद्र या ठिकाणी दिनांक 24 व 25 या दिवशी सुमारे 40 ते 50 बालकांच्या शस्त्रक्रिया मोफत करणार आहेत
या कामी रोटरी क्लब ऑफ कुडाळ तसेच डॉक्टर संजय निगुडकर यांची सुशीला निगुडकर ट्रस्ट व बॅरिस्टर नाथ पे शिक्षण संस्था कुडाळ आणि सिविल सर्जन सिंधुदुर्ग डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सर्व प्रकारची मदत या शिबिरासाठी उपलब्ध केलेली आहे. या शिबिरामध्ये शस्त्रक्रियेसाठी सुमारे 40 ते 50 बालके उद्या ऍडमिट होत असून त्यांचे जेवण खाणे व नातेवाईकांचे जेवण खाणे याची संपूर्ण जबाबदारी उमेश गाळवणकर यांनी उचललेली आहे. तसेच सर्जरीसाठी लागणारी सर्व मदत सुशीला निगुडकर ट्रस्ट व सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. या शिबिरासाठी येणारे स्पेशालिस्ट टीम यांची जबाबदारी रोटरी क्लब कुडाळ यांनी घेतलेली आहे.
गेली पाच वर्षे हे शिबिर कुडाळ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याचा फार मोठा उपयोग आजारी बालकांना झाला आहे अशी माहिती डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष रोटरी क्लब कुडाळ यांनी दिली.

You cannot copy content of this page