रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एम फीट जीम यांचे संयुक्त आयोजन:अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा यांची विशेष उपस्थती..
कुडाळ : निरोगी शरिर आणि आनंददायी जीवन जगण याची जनजागृती करण्याच्या उद्देशान रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एम फीट जीम कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बाॅडीबिल्डिंग आणि महाराष्ट्र बाॅडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेन कुडाळ मध्ये २६ जानेवारी रोजी एम फीट क्लासिक 2025 या जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 जानेवारी रोजी कुडाळ नगरपंचायत पार्कींग मैदान भैरववाडी इथं सायं ६ वाजता हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा हे उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ९० स्पर्धकांनी ६ वजनीगटात सहभाग नोंदवला असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे आणि एम फीट जीमचे मनिष भोगटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी इव्हेंट चेअरमन सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राजीव पवार, खजिनदार मकरंद नाईक, राजन बोभाटे, प्रणय तेली, शशिकांत चव्हाण, रूपेश तेली आदी उपस्थित होते.
यावेळी मनीष भोगटे म्हणाले, या स्पर्धेला कुडाळ मालवण विधानसभा आमदार निलेश राणे ,निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे, कुडाळ पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली व राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, कुडाळ नगराध्यक्षा ,आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेला एम फीट जीमचे संचालक मनिष भोगटे यांचे आंतरराष्ट्रीय जीम ट्रेनर तथा आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा हे खास अमेरिकेहून उपस्थित राहणार असल्याचे एम फीट जीमचे संचालक मनिष भोगटे यांनी सांगितले.
हि स्पर्धा 50ते 55, 55ते 60, 60ते 65, 65ते 70, 70ते 75 व खुलागट अशा 6 वजनीगटात होणार असून सर्व वजनीगटातील मुख्य विजेत्याला रोख रू.25 हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे तर उत्कृष्ट इंप्रूव्ह विजेत्या स्पर्धकाला रोख रू 6000 व चषक ,उत्कृष्ट पोझर ला रोख रू 6000 व चषक ,प्रत्येक वजनी गटातील प्रथम क्रमांक रोख रू 5000 गोल्ड मेडल ट्राॅफी प्रमाणपत्र ,द्वितीय क्रमांक रोख रू 4000 सिल्व्हर मेडल चषक प्रमाणपत्र ,तृतीय क्रमांक रोख रू 3000 ब्रांझ मेडल चषक प्रमाणपत्र ,चौथा क्रमांक राख रू 2000 चषक प्रमाणपत्र ,पाचवा क्रमांक रोख रू 1000 चषक प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे इव्हेंट चेअरमन सचिन मदने यांनी सांगितले.
या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हयातील नामवंत शरिरसौष्ठव स्पर्धकांचा सहभाग असणार आहे.या भव्य स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयातील शरिरसौष्ठव स्पर्धकांना सहभागी व्हायचे असल्यास 9011379090 व 9325283384 यावर संपर्क साधण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी केले.
