⚡देवगड ता.२२-:
देवगड जामसंडे पूरक नळयोजनेला उद्भवणाऱ्या तसेच किंजवडें, कोटकामते, दहीबाव, नारिंग्रे,
तोरसोळे ग्रॅव्हिटीची नळयोजनेला प्रमुख उद्भवणाऱ्या सततच्या समस्येमुळे अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे.पाण्यामुळे होणारी जनतेची गैरसोय लक्षात घेता सदर नदिपात्रातील गाळ काढण्यात यावा यासाठी देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंधुदुर्ग पालकमंत्री तथा मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
अन्नपूर्णा नदीवर देवगड जामसंडे पूरक नळयोजना गेली कित्येक वर्षे चालू आहे. तसेच किंजवडे,तोरसोळे गावातील ग्रॅव्हिटीची नळयोजना १९८५ सालापासून कार्यान्वित आहे. वर्षानुवर्षे पडणाऱ्या पावसांमुळे सदर नदीला पुर येऊन नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून पाण्याची पातळी कमी होत गेलेली आहे.
तसेच नदीपात्र अरुंद होत पुराचा धोका वाढत आहे. त्यामुळे वित्तहानी बरोबरच जीवितहानी काही प्रमाणात होत असून, अन्नपूर्णा नदीतील गाळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे
देवगड जामसंडे पाण्याच्या प्रश्ना बरोबरच किंजवडे,कोटकामते,दहीबाव, नारिंग्रे,तोरसोळे या गावांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तरी सदर कामाला आपण तातडीने मंजूरी देऊन महत्त्वाचा प्रश्न सोडवावा, ही विनंती. अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर यांनी दिले आहे.
अन्नपूर्णा नदीपत्रातील गाळ काढण्या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांना देवगड भाजपाने दिले निवेदन…
