महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून ‘ओऍसिस’ प्रथम…

मालवणच्या शुभदा टिकम यांना सलग तीन वर्षे अभिनयाचे पारितोषिक..

⚡मालवण ता.१६-: महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण या संस्थेच्या ‘ओऍसिस’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच सातार्डे मध्यवर्ती संघ, कवठणी या संस्थेच्या गावय या नाटकास द्वितीय पारितोषिक तर सिध्दांत फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘तुम्हाला काय वाटतं?’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे या राज्य नाट्य स्पर्धेत मालवणच्या सौ शुभदा टिकम (नाटक ओऍसिस) या अभिनेत्रीने उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मिळविले असून सलग तीन वर्षे उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक पटकविणारी शुभदा टिकम ही एकमेव अभिनेत्री ठरली आहे

दरम्यान, या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सिंधुदुर्ग केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शनः प्रथम – हेमंत कदम (नाटक-ओऍसिस), द्वितीय -रुपेश कवठणकर (नाटक- गावय), प्रकाश योजना- प्रथम – शाम चव्हाण (नाटक ओऍसिस), द्वितीय – केदार सामंत (नाटक- द कॉन्शन्स), नेपथ्य: प्रथम- राजू रेगे (नाटक- गावय), द्वितीय – श्रीराज बांदेकर (नाटक ओऍसिस), रंगभूषा- प्रथम – संजय जोशी (नाटक- गावय), द्वितीय- प्रथमेश सामंत (नाटक ओऍसिस) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक रविंद्र हळदणकर (नाटक- गावय) व शुभदा टिकम (नाटक ओऍसिस), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- ईशा माळकर (नाटक- तनमाजोरी), वैभवी सोकटे (नाटक- श्याम तुझी आवस इली रे), रुपाली परब (नाटक- तुम्हाला काय वाटतं ?), कीर्ती सांगळे (नाटक- मुक्काम पोस्ट भोकरवाडी), प्रसाद खानोलकर (नाटक-तुम्हाला काय वाटतं ?), प्रा. प्रदीप होडावडेकर (नाटक- सूर्यास्त), चतुर पार्सेकर (नाटक- चार बापांचा मुलगा), मिलिंद कासार (नाटक- मिशन ५९).

दि. १ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला व मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे झालेल्या या नाट्य स्पर्धेत एकूण १२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. चंद्रकांत अत्रे, श्री. विजय रावळ आणि श्रीमती मृणालीनी (मंजुषा) जोशी यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे समन्वयक श्री. संजय शिंदे यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page