सायबर जनजागृतीसाठी बांदा शहरात रॅली…

बांदा/प्रतिनिधी
सायबर जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे व खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल आणि तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा यांच्या वतीने बांदा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.
सकाळी १०. ३० ते १२ वाजेपर्यंत बांदा शहरातील मुख्य बाजारपेठ येथे रॅली काढून सायबर जनजागृती, नशा मुक्ती व डायल ११२ या विषयांबाबत जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीत बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, पोलीस पोलीस अंमलदार, शिक्षक, विद्यार्थी मिळून 80 जणांनी सहभाग घेतला. या रॅलीस उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विभाग यांनी मार्गदर्शन केले.
फोटो :-
बांदा शहरात पोलीस प्रशासन व खेमराजच्या विद्यार्थ्यांनी सायबर जनजागृती अभियान अंतर्गत रॅली काढली.

You cannot copy content of this page