रस्ता दुरुस्ती प्रश्नावरून उद्या पासून सुरु करण्यात येणार होते उपोषण
*💫सावंतवाडी-;* तालुक्यातील कवठणी येथील मुख्य रस्ता ते मुरडवाडी ते ख्रिश्चन वाडी, मळेबाग वाडी पर्यंत रस्ता दुरुस्त करण्याचे काम विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झाले असताना देखील अद्याप पर्यंत या रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा सरपंचांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना दिला होता. याच अनुषंगाने आज पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या गावातील सरपंचांसह ग्रामस्थांची भेट घेत लॉक डाऊन संपल्यावर तात्काळ या रस्त्याचे काम सुरू करू असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर उद्यापासून सुरु करण्यात येणारे उपोषण ग्रामस्थांनी स्थगित करावे असे आवाहन केले आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी उद्याचे उपोषण स्थगित केले आहे.
