*💫कुडाळ,दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतिश जगन्नाथ सावंत यांनी श्री निवजेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित,निवजे येथील नूतन वास्तू ला भेट देऊन गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, निवजे संस्था अध्यक्ष संतोष पिंगुळकर, उपाध्यक्ष विल्यम डिसोजा, गोकुळचे डॉ. रेडकर, पोलीस पाटील सौ. प्राची शेडगे, ग्रा.प. सदस्य सूरेश गवाणकर, माजी सरपंच महेंद्र पिंगुळकर, महादेव पालव, पांडू पालव, दत्ता सावंत, सचिव अभय परब, निवजे सोसायटी चेअरमन सूर्यकांत सावंत व संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवजेतील दुग्ध उत्पादक संस्थेच्या इमारतीला सतीश सावंत यांची भेट
