⚡मालवण ता.०९-: आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. साहित्य संमेलनात प्रा. नागेश कदम यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोखले कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, बेळगावच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधुरी शानभाग, डॉ. आनंद बांदेकर, ऍड. विलास कुवळेकर, मंडळाच्या अध्यक्षा, साहित्यिका सौ. वृंदा कांबळी, डॉ.एम. बी. चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. नागेश कदम यांच्या या यशाबद्दल मालवण डीएड कॉलेजचें प्राचार्य हेमंत प्रभू, कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
