चौके येथे क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ…

⚡मालवण ता.०९-: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबर पासून शंभर दिवसीय क्षयरोग रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. आयुष्यमान आरोग्यमंदिर, चौके (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिठारी यांनी या उपक्रमाची माहिती देत मार्गदर्शन केले.

यावेळी चौके ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी .के .चौकेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिठारी तसेच कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांनी चौके ग्रामपंचायतीचे या उपक्रमाला सहकार्य राहील,अशी ग्वाही दिली. श्री. बाबा डांगमोडेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page