पुरळ हुर्शी कोठारवाडी येथे उ.बा.ठा शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

देवगड प्रतिनिधी

पुरळ हुर्शी कोठारवाडी येथे उ.बा.ठा शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि खासदानारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये भालचंद्र मुळम, लव मुळम, महेंद्र मुळम, दीपक मुळम, विलास मुळम, सुधाकर मुळम, प्रशांत मुळम, अनिल मुळम, साक्षी मुळम, रसिका मुळम, कविता मुळम, प्रगती मुळम, वृषाली मुळम, अस्मिता मुळम, प्रतिभा मुळम, वंदना मुळम, संतोष मुळम यांचा समावेश आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय विचारधारेबद्दल कार्यकर्त्यांचे स्वागत करताना भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी त्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, पडेल मंडलाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, प्रभारी डॉ. अमोल तेली तसेच अनेक भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page