प्रवीण भोसले: उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..
⚡सावंतवाडी ता.१२-: राजन तेली यांना सावंतवाडी मतदारसंघात जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून २३ तारीख ला नक्कीच महाविकास आघाडी सावंतवाडी मतदारसंघात गुलाल उधळणार असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज व्यक्त केला. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सावंतवाडी मतदारसंघात नवचैतन्याच वातावरण निर्माण झाले असून तरी सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री भोसले यांनी यावेळी केले.
