वोटर एटीएम घोटाळ्यातील लक्ष विचलीत करण्यासाठी माझ्यावर आरोप..

कंपास बॉक्स वितरण पारदर्शकच; अनारोजीन लोबों.यांचा संजू यांच्यावरच पलटवार

*💫सावंतवाडी दि.१७-:* आपण नगराध्यक्ष असताना कंपास बॉक्स ची निवेदिता काढण्यात आली होती. परंतु कंपास बॉक्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या कंपास बॉक्स ची फेर निवेदिता काढण्यात आली होती. त्यावेळी कमी किमतीचा कंपास बॉक्स ची किंमत ६० रुपये लावण्यात आली होती. वॉटर ए टी एम घोटाळ्यातील लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आपल्यावर हे आरोप होत असल्याचे ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहेत. भ्रष्टाचार करायचा असता तर फेर निवेदिता काढली नसती. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. नाव न घेता केलेल्या आरोपाचे चटके का लागले याचे उत्तर नगराध्यक्ष संजू परब यांनी द्यावे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

You cannot copy content of this page