वॉटर एटीएम प्रकरणावरुन रूपेश राऊळ यांची टिका;एटीएम घोटाळ्याची चौकशी लावणार
*💫सावंतवाडी दि.१७-:* शिवसेना गटनेत्या लोबो यांनी वाॅटर एटीएम मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केले होते. हे आरोप संजू परब यांना का झोमले? असा सवाल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच पालंकमंत्री निधी देत नसल्याचे वारंवार आरोप करत असलेले संजू परब यांनी काल पालकमंत्री निधी देतात हे स्वतः अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. तसेच त्या वाॅटर एटीएम बाबत आम्ही नक्कीच पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून चौकशी लावणार असल्याचा इशारा रूपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब यांना दिला आहे. यावेळी जेष्ठ नगरसेवीका अनोरोजीन लोबो, नगरसेवीका भारती मोरे ,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नगरसेवक बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, वॉटर ए टी एम घोटाळा दाबण्यासाठीच ज्येष्ठ नगरसेविका सौ. लोबो यांच्यावर कंपास पेटी घोटाळ्याचे खोटे आरोप करत आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी जिल्ह्यात कधीच ठेकेदाराना कधीच जोपासले नसून, ठेकेदाराना कोणी जोपासले ते सर्वांना माहीत आहे. असा जोरदार टोला लगावला आहे.
