चराठा ग्रा प सदस्य अमित परब यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यात ३६ आरोग्य उपकेंद्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व केंद्रांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सद्य स्थितीत संचारबंदी असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ये – जा करणे शक्य नसल्याने तसेच आर्थिक बाब लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
