सलून व्यावसायिक रविंद्र आडविलकर यांचा पेंडूर गावाने केला सत्कार…

विद्युत खांबावरुन पडणाऱ्या वायरमनला प्रसंगावधान दाखवत वाचविले होते

*💫मालवण दि.१७-:* पोलावर काम करताना शॉक लागून खाली पडणाऱ्या वायरमनला झेलून प्रसंगावधान राखत तेथील रिक्षाचालक दिपक गावडे यांच्या मदतीने वायरमन पावसकर यांना रुग्णालयात दाखल करत त्यांचे प्राण वाचवणाऱ्या सलून चालक रवींद्र उर्फ पप्पू आडविलकर यांचा पेंडूर गावच्या मदतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे. तसेच त्याला सलून व्यवसायात उपयोगी पडतील अशा वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. यावेळी आप्पा पटेल, दिपा सावंत, आतिक शेख, संजय नाईक, शेखर फोंडकर, जगदीश चव्हाण, संदीप चव्हाण, दिपक गावडे, संजय पेंडूरकर, नितीन राणे, बबन साटम, बाळा पटेल, लक्ष्मण घोगळे, सतिश पाटील, शंभू वारंग, पपू राणे, संदेश नाईक, प्रशांत राणे, किशोर राणे, अनिल पाटील, मकरंद नातू, सुमित सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page