*बँक ऑफ इंडिया बांदा शाखेत संजू विरनोडकर टीमचे निर्जंतुकीकरण

*बँक अधिकारी कोरोना बाधित सापडल्याने करण्यात आले निर्जंतुकीकरण*

*💫सावंतवाडी दि.१६-:* बांदा येथील भरवस्तीत असणाऱ्या बॅक ऑफ इंडिया या बँकेचे शाखा अधिकारी कोरोना बाधित झाल्याने संपुर्ण बॅक कर्मचारीवृंदाची स्वॅब टेस्ट घेण्याच्या निमित्ताने काल दिनांक १५ एप्रिल रोजी बॅक बंद ठेवण्यात आली होती. यावेळी नागरिक व बँकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून संपूर्ण बँक व एटीएम हे संजू विर्नोडकर व टीम मार्फत सॅॅनिटाईज करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भेडशी झरे बांबर येथे देखील कोरोना बाधित नागरिक आढळल्याने त्याही वसाहतीत व बाधीतांच्या घरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. या उपक्रमात दिपक सुतार, सागर मळगावकर, दोडामार्ग व भेडशी येथील युवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी संजू विरनोडकर व टीमचे बँक ऑफ इंडियाचे अधिकारी नंदकुमार प्रभूदेसाई व बँक कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत. सतत एक वर्षाहून अधिक काळ कोरोना विरुद्ध संजू विर्नोडकर टीम लढते आहे याबद्दल बांदा सरपंच अक्रम खान यांनीदेखील या टीमचं कौतुक करून धन्यवाद दिले आहेत.

You cannot copy content of this page