*💫कणकवली दि.१७-:* जेष्ठ दशावतारी कलाकार तथा राष्ट्रीय काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते बी.के.तांबे ( वय 68 ) यांचे हळवल येथील राहत्या घरी निधन झाले.भिकाजी कमलाकर तांबे हे बी.के.या टोपणनावाने सर्वपरिचित होते. आज पहाटे हळवल येथील राहत्या घरी हृदयविकारच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालावली. दशावतारी कलाकारांना संघटित करून त्यांना पेन्शन सह त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बी.के.यांनी शासनदरबारी नेहमीच पाठपुरावा करून अनेक कलाकारांना पेंशन मिळवून दिली होती. राष्ट्रीय काँग्रेसचे जुने कार्यकर्ते म्हणून त्यांनी सक्रिय काम केले होते. त्यांच्या निधनाने अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले आहे.
जेष्ठ दशावतारी कलाकार, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ते बी.के.तांबे यांचे निधन…
