प पू ओम दत्त श्री ठाकुर महाराजांचे देहावसान..

मालवण दि प्रतिनिधी ओम दत्त परिवाराद्वारे असंख्य भक्तगणांना प्रपंचात राहून परमार्थात रमायला शिकवणारे,आणि नामस्मरणचे महत्व सांगणारे प. पू. ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर (८० वर्ष )यांचे पुणे येथील सौदामिनी संकुल येथे देहावसान झाले. गेल्या काही दिवसांपासून प. पू. ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रायगड जिल्ह्यातील उरण हे जन्मगाव असलेले परमपूज्य श्री ठाकूर महाराज यांनी ओम दत्त परिवाराची स्थापना केली आणि अनेक भक्तांना मार्गदर्शन करुन श्री दत्तगुरुंच्या महिम्याची प्रचिती दिली. मुंबई, पुणे, गोवा, डोंबिवली ,रत्नागिरी ,ठाणे,रोहा व परदेशी मोठ्या प्रमाणावर ओम दत्त परिवाराचे अनुयायी आहेत. पश्चात पत्नी,एक मुलगा, मुलगी, सून , नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page