विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना, युवा रक्तदाता संघटना सरसावली,मागील लॉकडाऊनमध्येही घेतला होता पुढाकार
*💫सावंतवाडी-:* विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेक समाज उपयोगी कार्य करण्यात आली होती. त्याचप्रमाणे राज्यात पुन्हा एकदा लावण्यात आलेल्या संचारबंदी मुळे पुन्हा एकदा भटक्या मुक्या जनावरांचे हाल होत असल्याने त्यांना अन्न पाण्याची सोय करण्यात आली आहे. आज पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी, अर्चित पोकळे, साईश निर्गुण, देवेश पडते, पार्थिल माठेकर, संदीप निवळे, मंथन राणे, अभिजित गवस, राघवेंद्र चितारी, विनायक गावस, सखाराम शेरलेकर, गजानन परब, राजू गोवेकर आदी उपस्थित होते. यावेळी दोन्ही संघटनांनी हॉटेल व्यवसायिकांना शासनाचे नियम पाळून हॉटेल सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी या सर्वांनी आपल्या आपल्या भागातील भटक्या मुक्या प्राण्यांना अन्न पाणी देऊन खारीचा वाटा उचलावा असे आवाहन ही केले आहे.
