अत्यावश्यक वगळता दुकाने सुरु दिसल्यास कारवाई…

नगरपालिका आरोग्य विभागाने दुकानदारांना दिली समज

सावंतवाडी: ब्रेक द चेन मधून राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. परंतु या काळात सरकारने फक्त अत्यावश्यक सुविधा देणारी आस्थापने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. तरी देखील शहरात अत्यावश्यक सेवेत नसलेली काही दुकाने सुरू असलेली दिसून आली. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेने याबाबत तात्काळ दखल घेऊन ती दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर, अशी दुकाने पुन्हा सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर, विनोद सावंत या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेत फिरून त्या दुकानदारांना समज दिली.

You cannot copy content of this page