वाडा सडेवाडी येथे गुरुवारी घडला होता अपघात;चालकावर गुन्हा दाखल
*💫देवगड दि.१६-:* वाडा सडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टेम्पो एक अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या मुलाकडे टेम्पो चालवायला देणाऱ्या टेम्पो चालकांवर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी ३:४५ चा सुमारास टेम्पो दुचाकी यामध्ये अपघात होऊन वाडा सडेवाडी येथे एक दांपत्य या अपघात जागीच ठार झाले होते. याप्रकरणी भरधाव वेगाने टेम्पो चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास स.पो.निरीक्षक संजय कातिवले करीत आहेत.
