*मेडिकल सेवा वगळता शनिवार रविवार कणकवलीत सर्व दुकाने बंद ठेवा ..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

*💫कणकवली दि.१६-:* शनिवार रविवारी दवाखाना व मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायत च्या वतीने करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोव्हीड पेशंट कणकवलीत सापडू लागले आहेत. त्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी सध्या लॉकडाऊनध्ये सुरू असलेली दवाखाने आणि मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन लाऊड स्पीकरद्वारे कणकवली नगरपंचायत ने केले आहे.

You cannot copy content of this page