सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३१ रूग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ३१ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात २१ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सबनीसवाडा १, सालईवाडा १, खासकीलवाडा ४, भटवाडी ४ तर ग्रामीण भागात नेमळे, माडखोल, मळेवाड, न्हवेली, बांदा, आजगाव, तळवणे, केसरी या भागात प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडले असून, वेर्ले आणि सातार्डा येथे प्रत्येकी दोन – दोन रुग्ण सापडले आहेत. तर माजगाव ५ आणि कोलगाव ५ एवढे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १८९ सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page