⚡सावंतवाडी ता.०४-: महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राजनजी तेली यांना प्रचंड बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय कॉंग्रेस व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक श्री राजनजी तेली व माजी राज्य मंत्री श्री प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी या बैठकीस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे विधानसभा प्रमुख – रूपेश राऊळ, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे तालुका प्रमुख मायकल डिसोजा, निशांत तोरसकर सावंतवाडी महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी , भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष – ॲड राघवेंद्र नार्वेकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची युवती जिल्हाध्यक्ष – सौ. सावली पाटकर , कोकण विभागीय अध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट सचिन पाटकर,बाबल्या दुभाशी,माजी नगरसेविका – सौ. अफरोज राजगुरु, माजी नगरसेवक – उमेश कोरगावकर आदि महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
