विशाल परब बनले पालखीचे भोई !

विठ्ठलाच्या दिंडीसह पालखी सोहळ्यात झाले सहभागी

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला येथील चांदेरकर बुवा विठ्ठल मंदिरात आज पहाटे श्री विठ्ठलाच्या दिंडीसह निघालेल्या पालखी सोहळ्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार युवा नेते विशाल परब हे सहभागी होत, राम कृष्ण हरीच्या जयघोषात तल्लीन झालेले पहायला मिळाले. कोणताही मोठेपणाचा भाव न ठेवता विठुरायाची पालखी खांद्यावर घेऊन इतर वारकऱ्यांसह ते या पालखी सोहळ्यात देह भान विसरून नाचत होते.

You cannot copy content of this page