राजन तेली – विशाल परब समोरासमोर; एकमेकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.०१-: शहरात आज ठिक ठिकाणी लक्ष्मी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी बाजारपेठेत फिरून सर्व व्यापाऱ्यांना तसेच शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा उमेदवार राजन तेली व भाजपात बंड करून अपक्ष म्हणून निवडून लढवणारे युवा नेते विशाल परब हे समोरा समोर आले असताना, दोघांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, विधानसभा निवडणुकीसाठी देखील शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यात काहीवेळ गप्पा रंगल्याच्या देखील पाहायला मिळाल्या.

You cannot copy content of this page