जमीनच्या व्यवहारात फसवणाऱ्या संजू परब विरोधात तहसील कार्यालयासमोर जनतेने केलेलं उपोषण सिंधुदुर्गवासियांनी पाहिले…

आशिष सुभेदार:राजन तेली यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही; केसरकरांच्या बाजूला बसणारच जमिनीचा मोठा दलाल…

⚡सावंतवाडी ता.०१-:
निवडणूक लढवण्याची घोषणा करून नंतर पैसे घेऊन माघार घेणारे भाजपा पक्षाचे स्वयंघोषित आणि आत्ताचे स्वार्थासाठी धनुष्यबाण हाती घेणारे संजू परब यांना शिवसेना उबाठा पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत ऊमेदवार राजन तेली यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सावंतवाडी शहरात जमीन दलाली करुन लोकांना फसवणाऱ्या याच परब विरोधात तहसील कार्यालयासमोर जनतेने उपोषण केले होती ही बाब त्यानी विसरू नये असा टोला उबाठा पक्षाचे शिवसैनिक आशिष सुभेदार यांनी लगावला.

शिवसेना उबाठा पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यावर संजू परब यांनी टीका केली त्याचा सुभेदार यांनी खरफुस शब्दात समाचार घेतला.

केसरकर दुसऱ्यांवर जमिनी लुटण्याचा आरोप करणारेच आता त्यांच्या आजू बाजूला बसलेले असतात. संजू परब हे जमीन व्यवहार मधील मोठे दलाल आहेत. शिरवळात जमीन घोटाळा कोणी केला हे संजू परब यांनी आम्हाला बोलायला लावू नये तर चराठा येथील एका जमीन प्रकरणात संजू परब यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषणास कोण बसल होत ते सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. राणेंकडे देखील ती महिला पुरावे घेऊन गेली होती त्यामुळे दलाल कोण आहे हे आता सर्वश्रृत आहे.असे सुभेदार म्हणाले.

You cannot copy content of this page