दीपक केसरकर हे जिल्ह्यातील एक अपप्रवृत्ती असून ते लवकरच जेलमध्ये असतील- बबन साळगावकर
⚡सावंतवाडी ता.०१-: नारायण राणे सोबत आमचे कोणतेही वैयक्तिक वैर नाही तर राजकीय वैर आहे. केसरकरांसाठी मैदानात उतरलेल्या राणेंनी याच केसरकरांनी त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकले होते. ते आधी पहावे आणि नंतरच दुसऱ्याला जेल मध्ये टाकण्याची भाषा करावी अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते गौरीशंकर खोत यांनी आज इथे केली आहे.
यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर बोलताना म्हणाले की, दुसऱ्याला अपप्रवृत्ती म्हणणारे केसरकरच जिल्ह्यातील अपप्रवृत्ती असून, येणाऱ्या निवडणुकीत जनता या उपप्रवृत्तीला घरी बसवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसऱ्याना जेल मध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या दीपक केसरकर यांनाच एक दिवस जेलची हवा खावी लागणार आहे अशी टीका देखील केली आहे.तर केसरकर यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आणि कशी आली याचा शोध घेणे गरजेचे असून, पहिला निवडणूकीत एवढी कमी प्रॉपर्टी असताना एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला असा सवाल देखील साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
