परशुराम उपरकर: निलेश राणेंच चिपळूण मधील भाषण अजूनही जनता विसरली नाही;…
⚡सावंतवाडी ता.०१-: माझ्या रेंज मध्ये आल्यावर एका एकाला बघतो असे म्हणणाऱ्या राणेंनी त्यांची रेंज आम्ही शिवसैनिकांनी कोकणात पसरवली हे विसरू नये, असा इशारा माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते परशुराम उपरकर यांनी दिला आहे. राणेंची रेंज केवळ मुंबई पुरती मर्यादित होती. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश मानून आम्ही त्यांची रेंज कोकणात पसरवली आहे. त्यांची रेंज पुन्हा एकदा मुंबई पुरती मर्यादित करायला आम्हा शिवसैनिकांना वेळ लागणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राणे आणि केसरकर यांच्यातील संघर्ष सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिला आहे. केवळ पद मिळवण्यासाठी जरी त्यांनी आपल्यातील संघर्ष विसरला असला तरी सिंधुदुर्ग वासिया तो संघर्ष विसरले नाहीत, हे दीपक केसरकर यांनी विसरू नये. निलेश राणे यांनी चिपळूण येथे जाऊन केलेले भाषण पाहून, कुडाळ आणि सावंतवाडी मतदार संघातील जनतेने जागृत राहून योग्य तेच मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
