सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ ः आरोस, दांडेली, न्हावेलेतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश:लक्ष्मीची पावले जनतेच्या दारी..
बांदा ः प्रतिनिधी
लक्ष्मीची पावले जनतेच्या दारी पडण्यासाठी प्रत्येक निवडणुकीला आमदार दीपक केसरकर आश्वासने देतात. परंतु जनतेचा कुठचा विकास झाला नाही किंवा लक्ष्मीची पावले दारी पडली नाहीत. मात्र केसरकरांच्या दारी पन्नास खोक्यांची पावले पडली, अशी टीका उबाठा शिवसेना सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.
न्हावेली येथे आरोस, दाडेली व न्हावेलीतील पदाधिकारी व ग्रामस्थांनी मळेवाड विभागप्रमुख गुरूनाथ नाईक व पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांच्या पुढाकाराने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख रियाज खान, न्हावेली शाखाप्रमुख आनंद मसुरकर, आरोस शाखाप्रमुख सुनील परब, दांडेली शाखाप्रमुख दादा आरोलकर तसेच मंदार नाईक, नंदु परब, आरोस उपशाखाप्रमुख गुरूनाथ रा. नाईक, गिरीश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
न्हावेली ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव, स्वप्निल जाधव, सुनिल नाईक, संदेश सावंत, गौतम सावंत, मनोज परब, यश परब, किरण परब, मयुर परब, आनंद नार्वेकर, सुनिल परब, अमोल सिद्ये, रोहित जाधव यांसह 55 कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल यांनी केले. युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी आभार मानले.
