नगरसेविका लोबो यानी अकलेचे तारे तोड़ू नयेत;नगराध्यक्ष संजू परब यांचा पलटवार
*💫सावंतवाडी दि.१६-:*.शहरात बसविण्यात आलेल्या वाॅटर एटीएम याचा नगरपालिकेशी कोणत्याही संबंध नसून नगरसेविका सौ. लोबो यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून अकलेचे तारे तोडू नयेत असा जोरदार पलटवार नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरसेविका सौ लोबो यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर केला आहे. या कामाची चौकशी करायची असेल तर नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करून पालकमंत्र्यांची चौकशी करावी. असा चिमटा देखील त्यानी यावेळी काढला आहे.
शहरात बसविण्यात आलेले वॉटर ए टी एम हे जिल्हा परिदेकडून नावीन्य योजनेअंतर्गत मिळाले असून, या कामकाजाला जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. या कामाशी नगरपालिकेचा काहीही संबंध नसल्याने नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा केलेला आरोप सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी नगरसेविका यांच्या कारकिर्दीत कंपास बॉक्स चा झालेल्या भ्रष्टाचारावर त्यानी स्पष्टीकरण द्यावे असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. १२ रुपयाची कंपास बॉक्स ६० रुपयांना विकुन भ्रष्टाचार उघड होईल म्हणून पुन्हा निवेदिता कोणी काढली होती. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
